भजनी मालिका
← भजनांकडे परत

सहस्रअठयांशींऋषि । स्कंद उपदेशीं तयांसी । तिही एक पुसिली पुसी । ते तयासी अकळ

sahasraathayanshinrushi | skand upadeshin tayansi | tihi ek pusili pusi | te tayasi akal

रचनाकार: संत नामदेव · अभंग
सहस्रअठयांशींऋषि । स्कंद उपदेशीं तयांसी । तिही एक पुसिली पुसी । ते तयासी अकळ ॥१॥ आतां जाऊं कैलासा । सकळ पुसूं त्या महेशा । मग निघाले आकाशा । पितृदेशा पातले ॥२॥ बरे होऊनियां सावध । ऐका भक्तीचा संवाद । विनवीता झाला स्कंद । तो अनुवाद शंभूचा ॥३॥ स्कंदें विनविला त्रिपुरारी । स-हित वामभागीं गौरी । स्तुति स्तयनें केलीं भारी । ह्लदासनीं नभि-येला ॥४॥ मग निघाला लोटांगणीं । ह्मणे त्राहें त्राहें शूळपाणि । करें उचलिला धांवोनि । मग आसनीं बैसविला ॥५॥ ऋषींसि आसनें देऊनि वेगां । जवळीं बैसविलें पैं गा । ते ह्मणती झड-करी सांगा । जें वेदशास्त्रांसी प्रिय ॥६॥ तंव स्कंद ह्मणे ताता । ऋषिनीं पुसिली जे वार्ता । ते आकळ माझिया चित्ता । वेद-शास्त्रार्थ विरहित ॥७॥ बरवीं तीर्थें पुण्यरासी । महात्म्यें सांगत होतों त्यांसी । परी तीर्थ क्षेत्र देवांसी । नाहीं चहूंसी एक भेळा ॥८॥ जे जे क्षेत्रीं करितां विचार । ते ते ठायीं तेंचि थोर । परि तयांमाजी असे सार । जें माहेर सकळिकां ॥९॥ पाप घडे जें जें मेदिनी । तयांसी तें तीर्थकरी धुणी । तीर्था वर्णी शूळपाणि । सांग हानि जें करी ॥१०॥ जळती पातकांचिया कोडी । ऐसीं तीर्थें आहेत गाढी । तयां सकळिकां तीर्थां । ओह खोडी । ते मी उघडी सांगेन ॥११॥ हिमकाळीं कीजे स्नान । हेचिं प्रयागासी न्यून । काशी इच्छी जो मरण । थोर निर्वाण पाविजे ॥१२॥ पितृस्मरण आचमन । करोनि देईजे पिंडदान । तेणें पूर्वज होती पावन । हेंचि न्यून गयेसी ॥१३॥ गाढें कुरुक्षेत्र जाण । तेथें किजे हिरण्यदान । केदारींचें उदकपान । करी पीडन देहासी ॥१४॥ उपमा द्वारकेडनी । अरुच गोमतीचें पाणी । सहा मास सेविल्यावांचुनी । नव्हे दाटणी चक्राशीं ॥१५॥ गंगा बारा वरुषें करी । सकळिकां मध्यें गोदावरी । सिंहस्थीं महिमा थोरी । हें न्यून भारी तयासी ॥१६॥ अयोध्या माया मथुरा – । कांची आवं-तिका करवीरा । लोण्हार हाटकेश्वर तुंगभद्रा । आणि पुष्करा कावेरी ॥१७॥ कलीमाजी वैकुंठ साक्षात । गाढें क्षेत्र जगन्नाथ । त्या देवासी नाहीं पाय हात । उणाव बहुत तयासी ॥१८॥ गाढें श्रीशै-ल्यपर्वत । लक्षावया उदित । तेथें जीवासी करिजे घात । हा उणाव बहुत तयासी ॥१९॥ गाढें क्षेंत्र परियेसा । गोकर्ण सेतुबंधु महेशा । तयासी उणाव ऐसा । जे यमदिशा म्हणताती ॥२०॥ ऐसीं तीर्थें कोटीरासी । परि लांछन आहे सर्वांसी । पहिलें राहिजे उपवासी । मग डोईसी मुंडण ॥२१॥ सकळ तीर्थांचा पारू । जोगा देखिला सागरु । तयासी उणाव आहे थोरु । योग येतो अमावास्ये ॥२२॥ म्हणोनि पुसों आलों तुज । सकळ तीर्थांचें बीज । तें झड-करी सांग मज । देवा तुज जें प्रिय ॥२३॥ ऐसी करोनी विनवणी । मग स्कंद लागला चरणीं । येरें उचलिला झड-करुनी । मग शूळपाणि हे बोलिले ॥२४॥ पुत्रा तुवां जे केली विनंती । हेंचि गिरिजा पुसत होती । तरी सांगेन तुजप्रती । चित देऊनि परियेसीं ॥२५॥ महिमा दरुशनाचा पूर्ण । एक लक्ष्मी जाणे खूंण । शुक सनकादिक मुनि सज्जन । आणि वै-ष्णव जन प्रेमळ ॥२६॥ जैसा कृपणाचा ठेवा । तैसें आर्त रे माझिया जीवा । पुत्रा पुसिलें तुवां । तरी वृत्तांत बरवा सां-गेन ॥२७॥ मी बैसोनियां स्मशानीं । जयाचें नाम जपें ध्यानीं । तें दैवत आहे जये स्थानीं । चित्त देऊनि परियेसा ॥२८॥ युग अठ्ठावीसांवरी । आहे पुंडलिकाच्या द्वारीं । विठ्ठल उभा भीमातीरीं । विश्व तारी दरुशनें ॥२९॥ घेऊनि तरुवरांची बुंथि । देव सेवा जाणवीती । आदिकरोनी पार्वती । आह्मां वस्ति तये ठायीं ॥३०॥ तेजें झळालें वैकुंठ । तयापरी चोखट । पहा पंढर-पूर नीट । महिमा अद्‍भुत तिहीं लोकीं ॥३१॥ जेणें पीडिलें तिन्ही लोकां । त्यासि वधावया पावलों देखा । ओढी का-ढोनी त्र्यंबका । श्रीहरि सखा स्मरिला ॥३२॥ घात करोनी त्रिपुरा । वधियेलें तिन्ही असुरां । तेंचि तीर्थ भिवरा । सचराचरा तारक ॥३३॥ प्रतिदिनीं माध्यान्हीं । सकळ तीर्थें तिये स्थानीं । भिवरे सुस्रात होऊनि । विठठलचरणीं लागती ॥३४॥ तये क्षेत्रीं पाप घडे । ऐसें बोलतां जीव्हा झडे । काय तुज सांगूं पुढें । ब्रह्म उघडें असे जेथें ॥३५॥ लोहो लागलिय परीसें । सोनें झालें एक सरिसें । आतां पालटेल कैसें । भलतें तैसें जरी झालें ॥३६॥ एक वेळ पंढ-रीये जाऊन । मग भलतिये ठायीं राहो कां जन । तो राहे वैकुंठींचा जाण । कर्महीन जरी झाला ॥३७॥ ऐसें ऐकोनी उत्तर । स्कंद ह-रुषें निर्भर । आदि करोनि ऋषीश्वर । पंढरपूर ठाकिती ॥३८॥ विष्णुदास नामा म्हणे । एक वेळ पंधरीये जाणें । विठठल धन्यावरी पाहणें । नाहीं येणें संसारा ॥३९॥