भजनी मालिका
← भजनांकडे परत

साकर दिसे परि गोडी न दिसे । तें काय त्यावेगळी असे

sakar dise pari godi na dise | ten kay tyavegali ase

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
साकर दिसे परि गोडी न दिसे । तें काय त्यावेगळी असे ॥१॥ तैसा जनीं आहे जनार्दन । तयांचें पहावया सांडीं अभिमान ॥२॥ कापुराअंगीं परिमळु गाढा । पाहतां उघडा केविं दिसे ॥३॥ पाठपोट जैसें नाहींच सुवर्णा । एका जनार्दन यापरी जाणा ॥४॥