भजनी मालिका
← भजनांकडे परत

संतासी भेटता अंग चोरीतो जाण वेश्या सुरा उरा ओळंगीतो

santasi bhetata ang chorito jan veshya sura ura olangito

रचनाकार: संत विठाबाई · अभंग
संतासी भेटता अंग चोरीतो जाण वेश्या सुरा उरा ओळंगीतो ।।१।। देवाकरीता पैका देता रडे रुका। विषयालागी फुका लुटीतसे ॥२॥ कोडियाचे बहुत आहे गोरेपणा अहंकारी ज्ञान तैसे समजा ॥३॥ विठाबाई म्हणे तोंडावरी थुंका जातो यमपुरी भोगावया ||४|| नकळे जया भक्तीचे महीमान त्याने ब्रह्मज्ञान बोलु नये ||५|| विठाबाई म्हणे ज्यासी नाही भक्ती त्याने भगवे हाती धरू नये ॥६॥