भजनी मालिका
← भजनांकडे परत

सतीं केला उपकार । मज निर्धार बाणला

satin kela upakar | maj nirdhar banala

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
सतीं केला उपकार । मज निर्धार बाणला ॥१॥ चुकविलें जन्माचें सांकडें । उगविलें कोडें बहुतांचें ॥२॥ गुण अवगुण नणितां मनीं । देती दरुशनीं मुक्ति त्या ॥३॥ शरण एका जनादनें । करुं वोवाळणीं देहाची ॥४॥