भजनी मालिका
← भजनांकडे परत

वैराग्याचा मेरु तो गोरा कुंभार । तोडियले कर आणेसाठीं

vairagyacha meru to gora kumbhar | todiyale kar anesathin

रचनाकार: संत निळोबा · अभंग
वैराग्याचा मेरु तो गोरा कुंभार । तोडियले कर आणेसाठीं ॥१॥ महाव्दारीं कथा श्रवण करितां । टाळी वाजवितां निघती नवे ॥२॥ तुम्ही देवा कृपादृष्टी अवलोकिला । ह्रदयीं तो धरिला प्रीतिकरीं ॥३॥ निळा म्हणे तुम्हां दासाचा अभिमान । अवतार म्हणूवन धरणें लागे ॥४॥