भजनी मालिका
← भजनांकडे परत

वैष्णव तो कबीर चोखामेळा महार। तिजा तो चांभार रोहिदास

vaishnav to kabir chokhamela mahar| tija to chambhar rohidas

रचनाकार: संत जनाबाई · अभंग
वैष्णव तो कबीर चोखामेळा महार। तिजा तो चांभार रोहिदास ||१|| सजण कसाई बाया तो कसाब। वैष्णव तो शुद्ध एकनिष्ठ ||२|| कमाल फुलार मुकुंद जोहरी। जिहीं देवद्वारीं वस्ति केली ॥३॥ राजाई गोणाई आणि तो नामदेव । वैष्णवांचा राव म्हणवितसे ॥४॥ वैष्णवांचरणीं करी ओवाळणी तेथें दासी जनी शरीराची ॥५॥