भजनी मालिका
← भजनांकडे परत

वैर करुनी मन मारावें । मनाधीन पैं न व्हावें

vair karuni man maraven | manadhin pain na vhaven

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
वैर करुनी मन मारावें । मनाधीन पैं न व्हावें ॥१॥ मनामार्ग जाऊं नये । मन आकळुनी मन पाहे ॥२॥ मन म्हणे तें न करावें । मनीं मनासी बांधावें ॥३॥ मन म्हणेल तें सुख । परी पाहतां अवघें दुःख ॥४॥ एका जनार्दनीं मन । दृढ ठेवावें आकळून ॥५॥