भजनी मालिका

भजने

मध्यें परमात्मा श्रीहरी । दधिओदन घेऊनि करीं । कवळ त्यांचियें मुखों भरी । आणि स्वीकारी आपणही ॥१॥ हें देखोनियां चतुराननें । परम संकोच मानिला मंने । मग म्हणे हें सध्यास्नानें । काहींची न करिती गोंवळ ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

मन करा रे प्रसन्न । सर्व सिद्धीचें कारण । मोक्ष अथवा बंधन । सुख समाधान इच्छा ते ॥१॥ मनें प्रतिमा स्थापिली । मनें मन पूजा केली । मनें इच्छा पुरविली । मन माउली सकळांची ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

मन करी आपुलें वासना ते वारी । सर्व हेंचि हरी भजत जाय ॥१॥ ब्रह्मनाम गोविंद नाहीं भेदाभेद । तुटे भवबंध हरी नामें ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

मन जाते जेथे दुःख दाखवी तेथे। नामावाचुनी वाचा बंद करी ॥१॥ तुजवीण चैन नाही चिदंबरा पायें या सत्वरा चिदंबरा ||२॥

रचनाकार: संत विठाबाई

मन जालें भाट । कीर्ती मुखें घडघडाट । पडियेली वाट । ये चि चाली स्वभावें ॥१॥ बोलें देवाचे पवाडे । नित्य नवे चि रोकडे । ज्या परी आवडे । तैसा तैसा करूनि ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

मन नेणेंज तुझ्या मनाचा विश्वास । येर तो हव्यास गोड वाटे ॥१॥ तुझें प्रेम नेणें तुझें प्रेम नेणें । सांग काय करणें केशिराजा ॥२॥

रचनाकार: संत नामदेव