भजनी मालिका
← भजनांकडे परत

मन गुंतलें लुलयां । जाय धांवोनि त्या ठाया

man guntalen lulayan | jay dhanvoni tya thaya

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
मन गुंतलें लुलयां । जाय धांवोनि त्या ठाया ॥१॥ मागें परती तो बळी । शूर एक भूमंडळीं ॥ध्रु.॥ येऊनियां घाली घाला । नेणों काय होई तुला ॥२॥ तुका म्हणें येणें । बहु नाडिले शाहाणे ॥३॥