भजनी मालिका
← भजनांकडे परत

मन कामना हरि मनें बोहरी

man kamana hari manen bohari

मन कामना हरि मनें बोहरी । चिंतितां श्रीहरि सुखानंद ॥ १ ॥ तें पुंडलिक तपें वोळलें स्वरूप । जनाचीं पै पापें निर्दाळिली ॥ २ ॥ वेणुनाद तीर्थ चंद्रभागा समर्थ । विठ्ठल दैवत रहिवास ॥ ३ ॥ निवृत्ति साकर विठ्ठल आचार । भिवरा तें नीर अमृतमय ॥ ४ ॥