भजनी मालिका

भजने

मथुरेसी गोरस विकूं जातां नितंबिनी । तयामाजीं देखिली राधिका गौळणी । जवळी जाऊनियां धरिली तिची वेणी ॥१॥ सोडी सोडी कान्हा शारंगपाणी । माझीया संसारा घातलें पाणी । नांव रुप माझें बुडविलें जनीं ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

मदनमूर्ति विश्वीं अळंकारिली । ते डोळ्यां असुमाय जाली । पाहतां मनाची वृत्ति नुपुरे तेथिची सोय ।

मंदिरा नेवोनि पलंगीं बैसविला । म्हणत हरीला तये-वेळीं ॥१॥ ऐसिया समयीं थोर तूं अससी । तरी ह्लषिकेशी बरें होतें ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

मदें मातलें नागवें नाचे । अनुचित वाचे बडबडी ॥१॥ आतां शिकवावा कोणासी विचार । कर्म तें दुस्तर करवी धीट ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

मंदोदरी पोटीं । सीतेसी व्हावी भेटी तयेसी करुं गोष्टी । स्वानुभवें ॥१॥ तंव दशानना मनीं । वश्य व्हावी शयनीं । धाडिली अशोकवनीं । मंदोदरी ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

मंदोदरी सांगे रावणाप्रती । स्वप्न देखिलें म्यां मध्यरातीं । नेणों वान्नर मिळाले किती । शिळा सागरू बांधिला ॥१॥ दोघे धनुर्धर वीर वान्नर । उतरोनी आले पैलसागर । एकापरीस एकगा वीर । ते बडीवार बोलताती ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

मधाचिया बोटा गुंतले लिगाडीं । तैशी परवडी संसाराची ॥१॥ वाउगाची सोस रचिलिया कंद । झाडुनि नेतां वेध मक्षिकेसी ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

मधुपर्कादिक नावडे पूजन । आवडे कीर्तन भाविकांचें ॥१॥ शंखचक्रादिक नावडती मनीं । वोडवितसे पाणी भाजीपाना ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

मधुरा उत्तरासवें नाहीं चाड । अंतरंगीं वाड प्रेम असो ॥१॥ प्राणावेगळा न करी नारायण । मग नसो ज्ञान मूर्ख बरा ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

मधुवन चांगलें लोचनीं देखीलें । तेथें मन रंगलें बाळकाचें ॥१॥ राहूं येथें करूं देवाची प्रार्थना । म्हणोनियां मना बोधवीत ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

मध्यान्हकाळीं मग हरीसी घेऊनि । करीतसे भोजन यशोदा तें ॥१॥ भोजन करूनि पलंगीं निजत । श्रीकृष्णासी घेत पुढें तेव्हां ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

मध्यें झालेम मौन देव निजध्यानीं । बौध्य ते म्हणोनी नांवें रूप ॥१॥ पाखांडें बहुत कलिमाजी झालीं । वणार्श्रम स-काळीं बुडविले ॥२॥

रचनाकार: संत नामदेव