भजनी मालिका
← भजनांकडे परत

मन नेणेंज तुझ्या मनाचा विश्वास । येर तो हव्यास गोड वाटे

man nenenj tujhya manacha vishvas | yer to havyas god vate

रचनाकार: संत नामदेव · अभंग
मन नेणेंज तुझ्या मनाचा विश्वास । येर तो हव्यास गोड वाटे ॥१॥ तुझें प्रेम नेणें तुझें प्रेम नेणें । सांग काय करणें केशिराजा ॥२॥ मज घातलें संसारीं पीडिलों कर्मभांडारीं । कृपा नरहरी करी मज ॥३॥ नामा म्हणे मी तों ठायींचाचि अपराधी । केशवा कांहीं बुद्धि सांग मज ॥४॥