भजनी मालिका
← भजनांकडे परत

भुक्ति आणि मुक्ति फुकाचें ठेवणें । श्रीगुरु जनार्दनें तुच्छ केलें

bhukti ani mukti phukachen thevanen | shriguru janardanen tuchchha kelen

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
भुक्ति आणि मुक्ति फुकाचें ठेवणें । श्रीगुरु जनार्दनें तुच्छ केलें ॥१॥ येर ब्रह्माज्ञाना काय तेथें पाड । मोक्षाचे काबाड वारियेलें ॥२॥ साधन अष्टांग यज्ञ तप दान । तीर्था तीर्थाटन शीण वायां ॥३॥ एका जनार्दनीं दाविला आरिसा । शुद्धी त्या सरसा सहज झालो ॥४॥