भजनी मालिका

भजने

भेटीची आवडी उताविळ मन । लागलेंसे ध्यान जीवीं जीवा ॥१॥ आतां आवडीचा पुरवावा सोहळा । येऊनी गोपाळा क्षेम देई ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

भेटीची आवडी उत्कंठित चित्त । न राहे निवांत एके ठायीं ॥१॥ जया देखे तया हेंचि पुसे मात । कां मज पंढरिनाथ बोलविना ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

भेटीलागीं जीवा लागलीसे आस । पाहे रात्रीं दिवस वाट तुझी ॥१॥ पूर्णिमेचा चंद्र चकोरा जीवन । तैसें माझें मन वाट पाहे ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

भेटीवांचोनियां दुजें नाहीं चित्तीं । येणें काकुलती याजसाठी ॥१॥ भेटोनियां बोलें आवडीचें गुज । आनंदाच्या भोजें जेवूं संगें ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

भेदचि याचा नये हातां । जाणिवा जाणतां नानापरी ॥१॥ मतमतांतरें वृथाचि होती । याच्या न पवती दारवंटा ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

भेदवादी जन वदतसे भिन्न । नव्हे तें लक्षण भज-नाचें ॥१॥ विश्वीं विश्वंभर कोंदलासे एक । भेदाचें कौतुक कैसें सांगा ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

भेदाभेद कर्म न कळे त्याचें वर्म । वाऊगाचि श्रम वाहाती जगीं ॥१॥ नामापरता मंत्र नाहीं त्रिभुवनीं । पाप ताप नयनीं न पडेचि ॥२॥

रचनाकार: संत चोखोबा

भेदाभेदताळा न घडे घालितां । आठवा रे आतां नारायण ॥१॥ येणें एक केलें अवघें होय सांग । अच्युताच्या योगें नामें छंदें ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

भोक्ता नारायण लक्षुमीचा पति । म्हणोनि प्राणाहुती घेतलिया ॥१॥ भर्ता आणि भोक्त कर्त्ता आणि करविता । आपण सहजता पूर्णकाम ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

भोग तो न घडे संचितावांचूनि । करावें तें मनीं समाधान ॥१॥ म्हणऊनी मनीं मानूं नये खेदु । म्हणावा गोविंद वेळोवेळां ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

भोगाची नव्हाळी न सुटे कोणे काळीं । वासना वोंगळी तेचि करी ॥१॥ वासनेचि थोरी सांगवेना कांहीं । न सुटिजे कांहीं कोण्या काळीं ॥२॥

रचनाकार: संत नामदेव