भजनी मालिका
← भजनांकडे परत

भुक्तिमुक्तीस कारण । हरीचे जन्मकर्म गुण

bhuktimuktis karan | hariche janmakarma gun

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
भुक्तिमुक्तीस कारण । हरीचे जन्मकर्म गुण ॥१॥ हरिकीर्तनाची जोडी । सकळ साधनें होतीं बापुडीं ॥२॥ शिळा तारिल्या सागरीं । गोवर्धन उचलिला करीं ॥३॥ निमाला गुरुपुत्र आणिला । मुखें दावाग्नी प्राशिला ॥४॥ तो सांवळां श्रीहरी । एका जनार्दनीं चरण धरी ॥५॥