भजनी मालिका
← भजनांकडे परत

भुके नाहीं अन्न । मेल्यावरी पिंडदान

bhuke nahin anna | melyavari pindadan

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
भुके नाहीं अन्न । मेल्यावरी पिंडदान ॥१॥ हे तों चाळवाचाळवी । केलें आपण चि जेवी ॥ध्रु.॥ नैवेद्याचा आळ । वेच ठाकणीं सकळ ॥२॥ तुका म्हणे जड । मज न राखावें दगड ॥३॥