भजनी मालिका
← भजनांकडे परत

भुंकती तीं द्यावीं भुंकों । आपण त्यांचें नये शिकों

bhunkati tin dyavin bhunkon | apan tyanchen naye shikon

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
भुंकती तीं द्यावीं भुंकों । आपण त्यांचें नये शिकों ॥१॥ भाविकांनीं दुर्जनाचें । कांहीं मानूं नये साचें ॥ध्रु.॥ होईल तैसें बळ । फजीत करावे ते खळ ॥२॥ तुका म्हणे त्यांचें । पाप नाहीं ताडणाचें ॥३॥