भजनी मालिका

भजने

बरें झालें आलीं ज्याचीं त्याच्या घरा । चुकला पा†न्हेरा ओढाळांचा ॥१॥ बहु केलें दुखी त्यांचिया सांभाळें । आतां तोंड काळें तेणें लोभें ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

बरें झालें देवा निघालें दिवाळें । बरी या दुष्काळें पीडा केली ॥१॥ अनुतापें तुझें राहिलें चिंतन । जाला हा वमन संवसार ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

बरें झालें येथें आलोंसे सायासें । सुख दु:ख लेशे भोगोनियां ॥१॥ मागिला लागाचें केलेंसे खंडण । तेणें समाधान वृत्ति होय ॥२॥

रचनाकार: संत चोखोबा

बरे देवा कुणबी केलों । नाहीं तरि दंभेंचि असतों मेलों ॥१॥ भलें केलें देवराया । नाचे तुका लागे पायां ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

बरें वा वाईट नाम कोणी घोका । तो होय सखा विठोबाचा ॥१॥ कोणत्या सहावासें जाय पंढरीसी । मुक्ति दारापाशी तिष्ठे सदा ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

बरें हें वाईट आहे माझे भाळीं । तें सुखें हो बळी जीवें माझ्या ॥१॥ आतां कोणावरी रूसों नये देवा । भोग तो भोगावा आपुलाची ॥२॥

रचनाकार: संत चोखोबा

बरें होणार ते झाली माझी गती । हळहळ किती वाढवावी ॥१॥ परी तुमच्या ब्रीदा लागला कळंक । दुराविल्या एक मशक मी ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

बळ बुद्धी वेचुनियां शक्ती । उदक चालवावें युक्ती ॥१॥ नाहीं चळण तया अंगीं । धांवें लवणामागें वेगीं ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

बळीचे द्वारी आपण वामन झाला । इंद्राच्या कैवारें बळी पाताळीं घातिला ॥१॥ तोचि महाराज उभा विटेवरी । करे धरिले कटीं पावलें दोन्हीं साजिरीं ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

बळीराजा दैत्य बहुत मातला । संपत्ति हरिल्या देवां-चिया ॥१॥ तयाकाळीम जे जे देव आठविती । प्रार्थना करिती देवदेवा ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

बळीवंत आम्ही समर्थाचे दास । घातली या कास कळिकाळासी ॥१॥ तेथें मानसाचा कोण आला पाड । उलंघोनि जड गेलों आधीं ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

बळें बाह्यात्कारें संपादिलें सोंग । नाहीं जाला त्याग अंतरींचा ॥१॥ ऐसें येतें नित्य माझ्या अनुभवा । मनासी हा ठावा समाचार ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम