भजनी मालिका
← भजनांकडे परत

बरें हें वाईट आहे माझे भाळीं । तें सुखें हो बळी जीवें माझ्या

baren hen vait ahe majhe bhalin | ten sukhen ho bali jiven majhya

रचनाकार: संत चोखोबा · अभंग
बरें हें वाईट आहे माझे भाळीं । तें सुखें हो बळी जीवें माझ्या ॥१॥ आतां कोणावरी रूसों नये देवा । भोग तो भोगावा आपुलाची ॥२॥ आहे जें संचित तैसें होत जात । वाउगा वृत्तांत बोल काय ॥३॥ चोखा म्हणे आतां बहु लाज वाटे । झालें जें वोखटें कर्म माझें ॥४॥