भजनी मालिका
← भजनांकडे परत

बळी आर्पिती देहासी । द्वारपाळ होसी तयासा

bali arpiti dehasi | dvarapal hosi tayasa

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
बळी आर्पिती देहासी । द्वारपाळ होसी तयासा ॥१॥ सांगा थोरपणा आहे कोण । घेतल्यावांचुन न देशी तूं ॥२॥ धर्म आधीं पूजा करीं । म्हणोनि घरीं राबसीं तूं ॥३॥ एका जनार्दनीं ऐसा उदार । घेतां निर्धार देशीं तूं ॥४॥