भजनी मालिका
← भजनांकडे परत

बळें बाह्यात्कारें संपादिलें सोंग । नाहीं जाला त्याग अंतरींचा

balen bahyatkaren sampadilen song | nahin jala tyag antarincha

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
बळें बाह्यात्कारें संपादिलें सोंग । नाहीं जाला त्याग अंतरींचा ॥१॥ ऐसें येतें नित्य माझ्या अनुभवा । मनासी हा ठावा समाचार ॥ध्रु.॥ जागृतीचा नाहीं अनुभव स्वप्नीं । जातों विसरुनि सकळ हें ॥२॥ प्रपंचाबाहेरि नाहीं आलें चित्त । केले करी नित्य वेवसाय ॥३॥ तुका म्हणे मज भोरप्या चि परी । जालें सोंग वरी आंत तैसें ॥४॥