भजनी मालिका
← भजनांकडे परत

बरें झालें आलीं ज्याचीं त्याच्या घरा । चुकला पा†न्हेरा ओढाळांचा

baren jhalen alin jyachin tyachya ghara | chukala pa†nhera odhalancha

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
बरें झालें आलीं ज्याचीं त्याच्या घरा । चुकला पा†न्हेरा ओढाळांचा ॥१॥ बहु केलें दुखी त्यांचिया सांभाळें । आतां तोंड काळें तेणें लोभें ॥ध्रु.॥ त्यांचिया अन्यायें भोगा माझें अंग । सकळ ही लाग द्यावा लागे ॥२॥ नाहीं कोठें स्थिर राहों दिलें क्षण । आजिवरी सिण पावलों तो ॥३॥ वेगळाल्या खोडी केली तडातोडी। सांगावया घडी नाहीं सुख ॥४॥ निरवूनि तुका चालिला गोवारें । देवापाशीं भार सांडवूनि ॥५॥