भजनी मालिका
← भजनांकडे परत

बरें सावधान । राहावें समय राखोन

baren savadhan | rahaven samay rakhon

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
बरें सावधान । राहावें समय राखोन ॥१॥ नाहीं सारखिया वेळा । अवघ्या पावतां अवकळा ॥ध्रु.॥ लाभ अथवा हानी । थोड्यामध्यें च भोवनी ॥२॥ तुका म्हणे राखा । आपणा नाहीं तोंचि वाखा ॥३॥