भजनी मालिका
← भजनांकडे परत

प्रीतीचा कलहे पदरासी घाली पीळ । सरों नेदी बाळ मागें पुढें पित्यासी

priticha kalahe padarasi ghali pil | saron nedi bal magen pudhen pityasi

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
प्रीतीचा कलहे पदरासी घाली पीळ । सरों नेदी बाळ मागें पुढें पित्यासी ॥१॥ काय लागे त्यासी बळ हेडावितां कोण काळ । गोवितें सकळ जाळीं स्नेहसूत्राचीं ॥ध्रु.॥ सलगी दिला लाड बोले तें तें वाटे गोड । करी बुझावोनि कोड हातीं देऊनि भातुकें॥२॥ तुका म्हणे बोल कोणा हें कां नेणां नारायणा । सलगीच्या वचना कैचें उपजे विषम।॥ ॥४॥