भजनी मालिका
← भजनांकडे परत

प्रात:काळीं सांगे सकळांसी कृष्ण । नका घेऊं अन्न आज कोणी

prat:kalin sange sakalansi krushna | naka gheun anna aj koni

रचनाकार: संत नामदेव · अभंग
प्रात:काळीं सांगे सकळांसी कृष्ण । नका घेऊं अन्न आज कोणी ॥१॥ सोडोनियां गायी चालीले वनासी । गडी ह्लषी-केशी खेळताती ॥२॥ वर्जियलें आम्हां नका घेऊं अन्ना । खावें काय कृष्णा आजी आतां ॥३॥ गडीयांसी सांगे वैकुंठींचा राणा । सांगावें ब्राह्मणा जावोनियां ॥४॥ वनीं उपवासी आहे रामकृष्ण । द्यावें त्यासी अन्न कृपा करोनी ॥५॥ गोपाळासी तेव्हां धाडी वासु-देव । पाहावया भाव याज्ञिकांचा ॥६॥ जोडोनियां हात वंदिती द्विजांसी । धाडिलें आम्हांसी कृष्णनाथें ॥७॥ नामा म्हणे ऐसें सांगती गोपाळ । याज्ञिकां सबळ अभिमान ॥८॥