भजनी मालिका
← भजनांकडे परत

प्रीतीच्या भांडणा नाहीं शिरपाव । वचनाचे चि भाव निष्ठुरता

pritichya bhandana nahin shirapav | vachanache chi bhav nishthurata

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
प्रीतीच्या भांडणा नाहीं शिरपाव । वचनाचे चि भाव निष्ठुरता ॥१॥ जीणें तरी एका जीवें उभयता । पुत्राचिया पिता दुखवे दुःखें ॥ध्रु.॥ काय जाणे तुटों मायेचें लिगाड । विषम तें आड उरों नेणें ॥२॥ तुका म्हणे मज करुणा उत्तरें । करितां विश्वंभरे पाविजैल ॥३॥