भजनी मालिका
← भजनांकडे परत

प्रारब्ध क्रियमाण संचिताचा भोग । भोगिल्याची भोग तो न सुटे

prarabdha kriyaman sanchitacha bhog | bhogilyachi bhog to na sute

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
प्रारब्ध क्रियमाण संचिताचा भोग । भोगिल्याची भोग तो न सुटे ॥१॥ ज्या जैसी कल्पना त्या तैशी भावना । अंती जे वासना जडोनी ठेली ॥२॥ एका जनार्दनीं वासना टाकुनी । हरीचे भजनी सावध होई ॥३॥