भजनी मालिका
← भजनांकडे परत

प्रार्थूनि सकळां बोले देवरावो । फेडावा संदेहो वासनेचा

prarthuni sakalan bole devaravo | phedava sandeho vasanecha

रचनाकार: संत नामदेव · अभंग
प्रार्थूनि सकळां बोले देवरावो । फेडावा संदेहो वासनेचा ॥१॥ स्नानविधीलागीं जावें चंद्रभागे । संताचेनि संगें आम्ही तुम्ही ॥२॥ बाप भक्तप्रिय कैवारिया मुरारी । लीला वोडंबरी खेळ खेळूं ॥३॥ नामयाचा हात धरोनि करकमळीं । चाले वनमाळी समारंभें॥४॥ नरनारी कवतुक पाहती सकळिक । स्वर्गीं ब्रह्मादिक ठकलें ठेले ॥५॥ सकल संतमेळासहित शारंगधरु । पाठी दळभारु ब्राह्मणांचा ॥६॥ आले चंद्रभागे हरिनाम गर्जत । केला प्रणिपात पुंडलिकसी ॥७॥ प्रक्षाळोनि चरण केले प्राणायाम । बाप सकळ धर्म जनिता स्वयें ॥८॥ समस्त द्विजकुलां करोनी प्रदक्षिणा । आरंभिले स्नानविधि देवें ॥९॥ चाचर कुरळ केश रुळती पाठीवरी । पितांबरधारी शामतनू ॥१०॥ सुंदर कमळनयन मुख प्रभाराशी । तें ध्यान मानसीं सनकादिकां ॥११॥ गोमयमृत्तिका आणोनियां देखा । प्रक्षाळुनी उदका वेदमंत्रें ॥१२॥ करुनि प्रयोग सारियेलें स्नान । केला परिधान सोनसळा ॥१३॥ ब्राह्मणाचें तीर्थ मस्तकीं वंदिलें । अभिवंदन केलें हरिच्या दासा ॥१४॥ सारोनियां संध्या नित्य नेम सर्व । पुजिले भूदेव दिधलीं दानें ॥१५॥ म्हणे कृपादृष्टीं मज केलें सनाथ । पुरविलें आर्त ह्र्दयीचें ॥१६॥ येथुनी संशयो न धरावा मानसीं । मानावेम आम्हांसी आत्मरुप ॥१७॥ चालिले सत्वर आले महाद्वारां । आज्ञा द्विजावराम दिधली देवें ॥१८॥ तेथें हरिखे निर्भर नामा निजबोधें । नाचतो आनंदें गरुडपारीं ॥१९॥