भजनी मालिका

भजने

पाहतां पाहतां कैसें पालटलें मन । देखणेचि दाविलेंक चोरुनी गगन ॥१॥ आनंदें जनार्दना लागलों मी पायां । गेली माझी माया नाहींपणे ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

पाहतां पाहतां नेत्र गेले । परी भुललेसे मेळे संसाराच्या ॥१॥ जाऊनि धरितो माझें म्हणोनियां । परी तें वायां जाती सर्व ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

पाहतां पाहतां परतलें मन । जालें समाधान चित्तीं माझें ॥१॥ संताचें संगतीं लाभ येवढा झाला । पंढरीये पाहिला विठ्ठल देवो ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

पाहतां पाहतां वेधलें मन । झालें उन्मन समाधिस्था ॥१॥ ऐसा परब्रह्मा पुतळा देखिलासे डोळा । पाहिला सावळा डोळेभरी ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

पांहता पाहता वेधलेंसे मन । तेणें समाधान जीवशिवां ॥१॥ जीवांचें जीवन मनाचें मोहन । वाचेसी मौन्य सदा पडे ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

पाहतां पाहतां वेधियेला जीव । सुखाचा सुखसिंधु पंढरीराव ॥१॥ माझा हा मीपणा हरपला जाणा । कळल्या आगम निगमाच्या खुणा ॥२॥

रचनाकार: संत चोखोबा

पाहतां विश्राम सुखवस्ती धाम । पंढरी पुण्यग्राम भुमीवरी ॥१॥ जावया उद्वेग धरिला माझा मने । उदंड शाहाणें तये ठायीं ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

पाहतील ग्रंथ सभाश्रेष्ठ महाजन । वैदिक शास्त्रज्ञ पुण्यश्लोक ॥१॥ देहान्त प्रायश्चित्त असे या बोलिलें । विचारुनि भलें हित करा ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

पाहतो देखतो कानीं जें ऐकतो । परी सदाचि पाहतो संसार मनीं ॥१॥ मीनाचिये परी गुंतलासे जळीं । परी संसारा कवळी अधम तो ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

पाहा किती आले शरण समान चि केले । नाहीं विचारिले गुण दोष कोणांचे ॥१॥ मज सेवटींसा द्यावा ठाव तयांचिये देवा । नाहीं करीत हेवा कांहीं थोरपणाचा ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

पाहा रे तमासा तुमचा नव्हे तेथें लाग । देईन तो भाग आलियाचा बाहेरी ॥१॥ जागा रे गोपाळ नो ठायीं ठायीं जागा । चाहुलीनें भागा दूर मजपासूनि ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम