भजनी मालिका
← भजनांकडे परत

पाहतां पाहतां परतलें मन । जालें समाधान चित्तीं माझें

pahatan pahatan paratalen man | jalen samadhan chittin majhen

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
पाहतां पाहतां परतलें मन । जालें समाधान चित्तीं माझें ॥१॥ संताचें संगतीं लाभ येवढा झाला । पंढरीये पाहिला विठ्ठल देवो ॥२॥ एका जनार्दनीं मनींच बैसला । नवजे संचला दीपु जैसा ॥३॥