भजनी मालिका

भजने

पायाळसी अंजन असावें डोळां । मग धनाचा कोहळा हातां लागे ॥१॥ तैसें पायाळपणें पुडलीक धन्य । दाविलें निधान पंढरीसी ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

पार नाहीं जयाच्या गुणा । तो उभा श्रीपंढरीचा राणा ॥१॥ नवल गे माय भक्ताचेसाठीं । कटीं कर ठेवुनी उभा वाळुवंटीं ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

पारधियासी तेव्हां दाटला गहींवर । लोटलें अपार प्रेम तेव्हां ॥१॥ जीवदान दिल्हें जावें तुम्हीं आता । न करावी चिंता कांहीं येथें ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

पारधी तो झड घालोनी पातला । घालावया घाला एकसरें ॥१॥ भयाभीत झालीं पांचही ते काळीं । वासना गुंतली एकमेकां ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

पालटे भावना संताचे संगती । अभाविकांहि भक्ति प्रगटतसे ॥१॥ ऐसा ज्याचा उपकार । मानिती निर्धार वेदशास्त्रें ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

पाला खाऊनियां धाला बहिणी घरीं । भक्तिलागीं हरि वेडा झाला ॥१॥ सुदाम्याचे पोहे कोरडेचि खाय । मटमटां पाहे चहूंकडे ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

पाळतोनि जाती घरासी तात्काळ । खेळ तो अकळ सर्व त्याचा ॥१॥ गोपाळ संवगडे मेळावोनि मेळा । मध्ये तो सावळा लोणी खाये ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

पाळिलों पोसिलों जन्मजन्मांतरीं । वागविलों करीं धरोनियां ॥१॥ आतां काय माझा घडेल अव्हेर । मागें बहु दूर वागविलें ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम