भजनी मालिका
← भजनांकडे परत

पाहतां पाहतां वेधलें मन । झालें उन्मन समाधिस्था

pahatan pahatan vedhalen man | jhalen unman samadhistha

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
पाहतां पाहतां वेधलें मन । झालें उन्मन समाधिस्था ॥१॥ ऐसा परब्रह्मा पुतळा देखिलासे डोळा । पाहिला सावळा डोळेभरी ॥२॥ तनु मन वेधलें तयाचे चरणीं । शरण एका एकपणें जनार्दनीं ॥३॥