भजनी मालिका
← भजनांकडे परत

पाहतां पाहतां वेधियेला जीव । सुखाचा सुखसिंधु पंढरीराव

pahatan pahatan vedhiyela jiv | sukhacha sukhasindhu pandharirav

रचनाकार: संत चोखोबा · अभंग
पाहतां पाहतां वेधियेला जीव । सुखाचा सुखसिंधु पंढरीराव ॥१॥ माझा हा मीपणा हरपला जाणा । कळल्या आगम निगमाच्या खुणा ॥२॥ भवसागराचा दाता । विठ्ठल विठ्ठल वाचे म्हणतां ॥३॥ उभा राहुनि महाद्वारीं । चोखामेळा दंडवत करी ॥४॥