भजनी मालिका
← भजनांकडे परत

पाहतां पाहतां नेत्र गेले । परी भुललेसे मेळे संसाराच्या

pahatan pahatan netra gele | pari bhulalese mele sansarachya

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
पाहतां पाहतां नेत्र गेले । परी भुललेसे मेळे संसाराच्या ॥१॥ जाऊनि धरितो माझें म्हणोनियां । परी तें वायां जाती सर्व ॥२॥ विषय भोगितो गर्दभाचे रितीं । लाभ तो निश्चिती लत्ताप्रहर ॥३॥ एका जनार्दनीं मंडुकाचे परी । वटवट खरी संसारीं ते ॥४॥