भजनी मालिका
← भजनांकडे परत

पाहतां पंढरिराया । त्याच्या मुक्ति लागे पायां

pahatan pandhariraya | tyachya mukti lage payan

रचनाकार: संत जनाबाई · अभंग
पाहतां पंढरिराया । त्याच्या मुक्ति लागे पायां ॥१॥ पुरुषार्थे चारी । त्याचें मोक्ष आर्जव करी ||२|| धन संपत्तीचा दाता होय पाहतां पंढरिनाथा ||३|| संताचे चरणीं लोळे नाचे दासी जनी ॥४॥