भजनी मालिका
← भजनांकडे परत

धन्य त्याचा शुध्‍द भावो । आरधिला देवो पंढरीचा

dhanya tyacha shudh‍da bhavo | aradhila devo pandharicha

रचनाकार: संत निळोबा · अभंग
धन्य त्याचा शुध्‍द भावो । आरधिला देवो पंढरीचा ॥१॥ धन्य त्यांचें जन्मकर्म । गाईलें नाम विठोबाचें ॥२॥ धन्य त्यांची देहक्रिया । आन उपाया नातळती ॥३॥ निळा म्हणे धन्य झाले । जे या गेले शरण हरी ॥४॥