भजनी मालिका
← भजनांकडे परत

धन्य त्यांची तयां माय प्रसवली । ज्यांची निष्ठा जडली विठ्ठल रुपीं

dhanya tyanchi tayan may prasavali | jyanchi nishtha jadali viththal rupin

रचनाकार: संत निळोबा · अभंग
धन्य त्यांची तयां माय प्रसवली । ज्यांची निष्ठा जडली विठ्ठल रुपीं ॥१॥ विठ्ठल आसनीं विठ्ठल भोजनीं । विठ्ठल शयनीं न विसंबती ॥२॥ त्यांचे सर्व काम पूर्ण मनोरथ । करिल हा नाथ पंढरिचा ॥३॥ निळा म्हणे ज्यांचा हेत पांडुरंगीं । रंगले ते जगीं धन्य जाले ॥४॥