भजनी मालिका
← भजनांकडे परत

धन्य ते पंढरी धन्य पंढरिनाथ । तेणें हो पतीत उद्धरिले

dhanya te pandhari dhanya pandharinath | tenen ho patit uddharile

रचनाकार: संत नामदेव · अभंग
धन्य ते पंढरी धन्य पंढरिनाथ । तेणें हो पतीत उद्धरिले ॥१॥ धन्य नामदेव धन्य पंढरिनाथ । तयानें अनाथ उद्धरिले ॥२॥ धन्य ज्ञानेश्वर धन्य त्याचा भाव । त्याचे पाय देव आम्हां भेटी ॥३॥ नामयाची जनी पालट पैं झाला । भेटावया आला पांडुरंग ॥४॥