भजनी मालिका
← भजनांकडे परत

धन्य तेचि संत भक्त भागवत । हृदयीं अनंत नित्य ज्यांच्या

dhanya techi sant bhakta bhagavat | hrudayin anant nitya jyanchya

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
धन्य तेचि संत भक्त भागवत । हृदयीं अनंत नित्य ज्यांच्या ॥१॥ धन्य त्यांची भक्ति धन्य त्यांचे ज्ञान । चित्त समाधान सर्वकाळ ॥२॥ धन्य तें वैराग्य धन्य उपासना । जयाची वासना पांडुरंगीं ॥३॥ एका जनार्दनीं धन्य तेचि संत । नित्य ज्यांचे आर्त नारायणीं ॥४॥