भजनी मालिका
← भजनांकडे परत

धन्य गुरुकृपा जाहली । अहंता ममता दुर गेली

dhanya gurukrupa jahali | ahanta mamata dur geli

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
धन्य गुरुकृपा जाहली । अहंता ममता दुर गेली ॥१॥ घालुनि अंजन डोळां । दाविला स्वयं प्रकाश गोळा ॥२॥ बोधी बोधविलें मन । नाहीं संकल्पासी भिन्न ॥३॥ देह विदेह निरसले । एका जनार्दनीं धन्य केलें ॥४॥