भजनी मालिका
← भजनांकडे परत

दैव आलिया त्याचिया दैवा । करिता सेवा आवडी

daiv aliya tyachiya daiva | karita seva avadi

रचनाकार: संत निळोबा · अभंग
दैव आलिया त्याचिया दैवा । करिता सेवा आवडी ॥१॥ तेही झाले संतचि अंगे । करिती संगे आणिकां ॥२॥ सहज त्यांची वर्तणुक । अवघ्या अधिक् साधनां ॥३॥ निळा म्हणे बोलती गोठी । त्याची रहाटी वेदाच्या ॥४॥