भजनी मालिका
← भजनांकडे परत

दैत्यभारें पीडिली पृथवी बाळा । म्हणोनि तूज येणें जालें गोपाळा । भक्तीप्रतिपाळक उत्सव सोहळा । मंगळें तुज गाती आबळ बाळा

daityabharen pidili pruthavi bala | mhanoni tuj yenen jalen gopala | bhaktipratipalak utsav sohala | mangalen tuj gati abal bala

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
दैत्यभारें पीडिली पृथवी बाळा । म्हणोनि तूज येणें जालें गोपाळा । भक्तीप्रतिपाळक उत्सव सोहळा । मंगळें तुज गाती आबळ बाळा ॥१॥ जय देव जय देव जय गरुडध्वजा । श्रीगरुडध्वजा। आरती ओवाळूं तुज भक्तीकाजा ॥ध्रु.॥ गुण रूप नाम नाहीं जयासी। चिंतितांची तैसा चि होसी तयांसी । मत्स्य कूर्म वराह नरसिंह जालासी। असुरां काळ मुणि ठाके ध्यानासी ॥२॥ सहजर रूपें नाम सांवळा ना गोरा । श्रुति नेती म्हणती तुज विश्वंभरा। जीवनां जीवन तूं चि होसी दातारा । न कळे पार ब्रह्मादिकां सुरवरां ॥३॥ संतां महंतां घरीं म्हणवी म्हणियारा । शंखचक्रगदाआयुधांचा भारा । सुदर्शन घरटी फिरे अवश्वरा । सकुमार ना स्थूळ होसी गोजिरा ॥४॥ भावेंविण तुझें न घडे पूजन । सकळ ही गंगा जाल्या तुजपासून । उत्पत्ती प्रळय तू चि करिसी पाळण । धरूनि राहिला तुका निश्चयीं चरण ॥५॥