भजनी मालिका
← भजनांकडे परत

दोन्ही कर ठेवूनी कटीं । उभा भीवरेचे तटीं

donhi kar thevuni katin | ubha bhivareche tatin

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
दोन्ही कर ठेवूनी कटीं । उभा भीवरेचे तटीं ॥१॥ रुप सांवळें सुंदर । गळां वैजंयती हार ॥२॥ कानां कुंडलें मकराकार । तेज न समाये अंबर ॥३॥ एका जनार्दनीं उदार । भीमातीरीं दिंगबर ॥४॥