भजनी मालिका
← भजनांकडे परत

दीनाचें उपार्जन करी पोटासाठीं । म्हणे मज लंगोटी द्याहो कोण्हीं

dinachen uparjan kari potasathin | mhane maj langoti dyaho konhin

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
दीनाचें उपार्जन करी पोटासाठीं । म्हणे मज लंगोटी द्याहो कोण्हीं ॥१॥ घेउनी संन्यास हिंडे दारोदारी । ‘ नारायण ‘ करी पोटासाठी ॥२॥ काम क्रोध वैरी सदोदित पीडी । वरी शेंडी बोडी करुनीं काई ॥३॥ व्यर्थ विटंबना करिती जनांत । संन्याशाची मात सोंग दावी ॥४॥ एका जनार्दनीं संन्यास साचा । रामनाम वाचा उच्चार करी ॥५॥