भजनी मालिका
← भजनांकडे परत

दिवसरात्रीं हाचि धंदा । वर्णितों गोविंदा गुणकीर्ति

divasaratrin hachi dhanda | varniton govinda gunakirti

रचनाकार: संत निळोबा · अभंग
दिवसरात्रीं हाचि धंदा । वर्णितों गोविंदा गुणकीर्ति ॥१॥ स्वप्नामाजी सुषुप्ती आंत । जागृतीये मात याचाचि ॥२॥ खातां जेवितां बोलतां । आठवे कथा नित्य याची ॥३॥ निळा म्हणे लगटोनि आलें । पीक चांगले असंभाव्य ॥४॥