भजनी मालिका
← भजनांकडे परत

दीन म्हणोनी नाच रे कीर्तनीं । तेणें चक्रपाणी करी कृपा

din mhanoni nach re kirtanin | tenen chakrapani kari krupa

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
दीन म्हणोनी नाच रे कीर्तनीं । तेणें चक्रपाणी करी कृपा ॥१॥ अनाथाचा नाथ पतीतपावन । म्हणोनी कीर्तन तया गोडी ॥२॥ एका जनार्दनीं गोडाचें तें गोड । कीर्तन सुरवाड तिहीं लोकीं ॥३॥