भजनी मालिका
← भजनांकडे परत

दीन आणि दुर्बळांसी । सुखरासी हरीकथा

din ani durbalansi | sukharasi harikatha

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
दीन आणि दुर्बळांसी । सुखरासी हरीकथा ॥१॥ तारूं भवसागरींचें । उंचनीच अधिकारी ॥ध्रु.॥ चरित्र तें उच्चारावें । केलें देवें गोकुळीं ॥२॥ तुका म्हणे आवडी धरीं । कृपा करी म्हणऊनी ॥३॥