भजनी मालिका
← भजनांकडे परत

दिसंदिस कैसा झालासी शहणा । गोवळांसी खेळसी पंढरीच्या राण्या

disandis kaisa jhalasi shahana | govalansi khelasi pandharichya ranya

रचनाकार: संत नामदेव · अभंग
दिसंदिस कैसा झालासी शहणा । गोवळांसी खेळसी पंढरीच्या राण्या ॥१॥ विश्वामाजी तुझे बोभाट मोठे । जन्ममरणाचे संकल्प तुटे ॥२॥ अकळ करणी नकळे लिहितां धरणी । सिंधुमणि करूनि नाम तुझें ॥३॥ नामा ह्मणे कीर्ति काय वानूं देवा । भक्तांचा कुडावा ब्रीद तुझें ॥४॥