भजनी मालिका
← भजनांकडे परत

त्रिगुणाचें मूळ सत्रावीचें सार

trigunachen mul satravichen sar

त्रिगुणाचें मूळ सत्रावीचें सार । उन्मनीचें बीज जाण रया ॥१॥ शून्य ब्रह्म पूर्ण चक्षूचे अंतरीं । निर्विकार निरंजन तोची तें गा ॥२॥ सूर्य चंद्र दोनी प्रकाशले साजिरे । त्रिकूट संचरे आत्मठसा ॥३॥ ज्ञानदेव म्हणे निवृत्तिप्रसादें । राहा रे निजबोधें निरंतर ॥४॥