भजनी मालिका
← भजनांकडे परत

त्याचें सुख नाहीं आलें अनुभवा । कठिण हें जिवा तोंचिवरी

tyachen sukh nahin alen anubhava | kathin hen jiva tonchivari

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
त्याचें सुख नाहीं आलें अनुभवा । कठिण हें जिवा तोंचिवरी ॥१॥ मागिलांचे दुःख लागों नेदी अंगा । अंतर हें संगा नेदी पुढें ॥२॥ तुका म्हणे सर्वविशीं हा संपन्न । जाणती महिमान श्रुति ऐसें ॥३॥